Tuesday, June 30, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District भाजप विरहित सत्ता स्थापनेसाठी हालचालींना आला वेग

भाजप विरहित सत्ता स्थापनेसाठी हालचालींना आला वेग

160
Adv

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्त निवडून आले असले तरी अजितदादांची राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री यांची शिवसेना गट सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करत आहे

भाजप विरहित जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पालकमंत्री शंभूराजे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपली व्यूहरचना आखली होती आणि ती यशस्वी झाली असल्याने भाजप विरहित शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याच्या हालचालींना आता वेग आला आहे

येत्या दोन दिवसात शिवसेना व राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणारच असल्याचा दावा करणारा असून भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी भाजपची सत्ता यावी यासाठी जिल्हा पिंजून काढला होता मंत्री शिवेंद्रसिंह राजे त्यात यशस्वी झाले मात्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना तालुक्यातच पराभव पत्करावा लागल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहावे लागणार हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जाते

पालकमंत्र्यांच्या घरी झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या चहा गोड होता अशी प्रतिक्रिया श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली होती त्यामुळे सत्ता स्थापन करून पुन्हा गोडवा आणण्याचा प्रयत्न ते करणार असल्याचे बोलले जाते

Adv