भरगुडे पाटलांना खंडाळ्याची जनता माफ करणार नाही

62
Adv

जिल्हा परिषद निवडणुकीचे प्लॅनिंग केले व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांनी ऐनवेळी केलेला दगा फटका शिरवळ व परिसरातील जनता कदापिही माफ करणार नसल्याचा निर्धार केला आहे

जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदसह राष्ट्रवादीच्या माध्यमातून सत्ता भोगून बराच काळ लाभ घेऊन ऐनवेळी पुढे पाटलांनी खंडाळा तालुक्याला दगा दिला असल्याने नितीन बापूंच्या विरोधात खंडाळा तालुक्यात प्रचंड विरोधाची लाट असल्याने नितीन बापू भाजप पक्षात तरी शेवटपर्यंत राहतील का हेच बघणे आता उत्सुकतेचे असेल

शिरवळ गटातून राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले तर त्यांचे विरुद्ध ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले नितीन भरगुडे पाटील हे समोरासमोर निवडणुकीसमोर उभे आहेत जिल्हा परिषद निवडणुकीचे पूर्ण प्लॅनिंग मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन काका व भरगुडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले मात्र ऐनवेळी सर्वांना फटका देत नितीन बापूंनी भाजपची वाट धरली वीस वर्षे राष्ट्रवादी बरोबर राहून ज्यांना मांढरदेव चा रस्ता करता आला नाही त्यांनी राष्ट्रवादी वर केलेली टीका म्हणजे हास्यजत्रा असल्याचे बोलले जात आहे

नितीन बापूंच्या राजकीय लीला या जिल्ह्याला माहिती राजकीय लीलातही नितीन बापू यावेळी निर्णय घेताना फसले असून संपूर्ण खंडाळा तालुक्यात एक प्रकारे नितीन बापूंच्या विरोधात संतापाची लाट असून निवडणुकीच्या निकालातूनच त्यांना आम्ही तो संताप दाखवू अशी प्रतिक्रिया शिरवळ येथील काही ज्येष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली

पक्षप्रवेश कोणी कोणत्या पक्षात करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असून ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले त्या पक्षाची सत्ता गेल्यावर आपण क्षणात सत्तेसाठी असा निर्णय घेतल्याने येथील जनता प्रचंड नाराज असल्याचे दिसते

Adv