कोपर्डे प्रतिष्ठानचे पुरस्कार स्त्रीशक्तीचा सोहळा डॉ. भारती पाटील

10
Adv

सातारा – महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी स्त्री शक्तीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी भारतात स्त्री पुरुष समतेचे बीजारोपण केले. तो विचार समाजामध्ये रुजवणाऱ्या प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार हे स्त्री शक्तीचा सन्मान करणारे आहेत,असे मत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्षाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने २०२५ चा साहित्य क्षेत्राचा कृष्णामाई जीवनगौरव पुरस्कार जयसिंगपूर येथील ज्येष्ठ कवी,कादंबरीकार नीलम माणगावे यांना व समाज परिवर्तन क्षेत्राचा सात- तारा जीवनगौरव पुरस्कार मुरबाड -ठाणे येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे यांना चाळीस हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह ,शाल पुष्पगुच्छ व सातारा कंदी पेढे या स्वरूपातील पुरस्कार डॉ. भारती पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतिदिनी आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, लेखक प्रमोद मनोहर कोपर्डे, साहित्य समीक्षक, अभ्यासक डॉ.गजाननअपिने पुणे,कवी वसंत शिंदे सातारा,ज्योत्स्ना पाटील- शिंदे मुंबई आदी मान्यवर विश्वस्त उपस्थित होते. यावर्षीच्या पुरस्काराचे हे पाचवे तर एकूण पुरस्काराचे दहावे वर्ष होते.

Adv