जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा पहिलाच मेळावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातच घेतला आहे
भाजपने जिल्हा परिषद निवणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर शरद पवार व अजित पवार गट एकत्रितपणे आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले असून दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त मेळावा उद्या ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या तालुक्यात म्हणजेच खटाव बुध येथे होणार आहे
राष्ट्रवादीने पहिला मेळावा ग्रामविकास मंत्री यांच्याच तालुक्यात घेतल्याने येणाऱ्या निवडणुकीत रंगत येणार असून उद्या होणाऱ्या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे





