सातारा वाई रहिमतपूर पालिकेत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ताकत असल्याने सातारा पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष होणार यात कोणतीही शंका नाही
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांना यश येणार असल्याचे दिसत असून वाई व रहिमतपूर पालिकेवर भाजपचाच नगराध्यक्ष होणार तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला इथे धक्का बसू शकतो असे चित्र निर्माण झाले आहे तर म्हसवड मध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा व नगरसेवक भाजपच्या असे चित्र दिसल्यास आश्चर्य व्यक्त करायला नको
फलटणमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेतराजे यांचा विजय जवळ जवळ निश्चित असून राजे गटाची संपूर्ण ताकद नगराध्यक्ष सर्व उमेदवारांच्या पाठी असल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार असा ठाम विश्वास येतील जनता करत आहे
तिकडे भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांना धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे त्याला कारण की राजेंद्रसिहं यादव व त्यांचे बंधू विजयसिंह यादव यांचे असलेले कराडवासीयांशी असलेले ऋणानुबंध तसेच मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी कराड पालिकेसाठी राजेंद्रसिंह यादव यांचे माध्यमातून दिलेला विकास निधी
महाबळेश्वर मलकापूर पाचगणी मेढा या ठिकाणी जोरदार लढती झाली असून नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये कोणाची वर्णी लागणार आहे हे सांगणे जरा अवघड असल्याचे बोलले जात आहे





