पालिका निवडणुकीच्या निकाला आधीच काही जणांना पडले स्वीकृत नगरसेवक पदाचे स्वप्न

58
Adv

सातारा नगरपालिका निवडणूक होऊन पंधरा दिवस लोटले पण अद्याप निकाल येणे बाकी असल्याने निकाला आधीच काहींना स्वीकृत नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागल्याने नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार व मंत्रिमोहदय यांच्या शब्दाला मान देऊन अनेकांनी आपली उमेदवारी जाहीर केली नाही मात्र आता निवडणुकीच्या निकाला आधीच स्वीकृत नगरसेवक पदाचे विमान उडण्याची तयारी काही कार्यकर्त्यांनी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून दोन्ही नेत्यांकडे संबंधित नगरसेवकाचे हितचिंतक यांनाच संधी मिळावी अशे प्रयत्न चालू आहेत

ज्या नगरसेवकांना आपण निवडून येणार अशी खात्री आहे अशाच नगरसेवकांच्या सहकाऱ्यांना स्वीकृत पदाची माळ गळ्यात पाडावी अशी अपेक्षा आहे मात्र दोन्ही राजेंसाठी वर्षानुवर्ष एकनिष्ठ राहून काम केले अशा लोकांना संधी मिळणार की नगरसेवकाच्या सहकाऱ्यांना सन्मान मिळणार याकडे लक्ष लागले आहे

Adv