अपक्ष उमेदवारांची प्रचारात आघाडी

32
Adv

सातारा पालिकेच्या निवडणुकीत अपक्षांचाच बोलबाला दिसत असून या अपक्षांमुळे थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला क्रॉस ओटिंग होण्याची शक्यता दाट असल्याचे बोलले जात आहे

भाजपच्या उमेदवारांवर नगराध्यक्षांची मदार असून आता काही अपक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून एखाद दुसरा अपवाद वगळता इतर ठिकाणी अपक्षांचाच बोलबाला असल्याचे बोलले जात असल्याने भाजपच्याच उमेदवारांना आता धक्का मिळणार की मतदारांची पसंती मिळणार हे येत्या आठ दिवसात चित्र स्पष्ट होईलच आजच्या घडीला मात्र भाजपचेच उमेदवार धोक्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे

अपक्ष उमेदवारांना थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कुठेतरी कमी पडली त्यामुळेच सातारा शहरात बरेच अपक्ष उमेदवार उभे राहिले काही प्रभागात दोन दोन अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने हा संभाव्य धोका भारतीय जनता पार्टी व येथील स्थानिक नेत्यांनाच बसू शकतो अशी चर्चा सध्या साताऱ्यात रंगत आहे

Adv