क्षेत्रमाहुली ता. सातारा येथील पुलाला १०० वर्षे पूर्ण होऊन गेली गेली १० वर्षापूर्वी ब्रिटीश सरकारने आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले होते की, l१०० वर्षे होऊन गेलेली आहेत. तरी पुलाचे काम मंजूर असून अद्याप फक्त १० टक्के काम केले आहे. सदरचा पुल एवढा धोकादायक झाला आहे की, १ ते २ दोन महिन्यातून मोठा अपघात होतो.त्यात
जिवीत हानी झाल्याशिवाय राहत नाही.आजपर्यंत सदर पुलावर खूप प्रमाणात मोठे अपघात झाले आहेत व अपघाता मध्ये मोठ्या प्रमाणात जिवित हानी होऊन माणसांचे बळी गेले आहेत.
सदर प्रकरणी प्रशासनाला बरेच अर्ज दिले गेलेले आहेत. या अगोदर क्षेत्रमाहुली पंचक्रोषी रस्ता रोको आंदोलन केले होते. पण तेवढ्या पुरते प्रशासन लक्ष देत आहे.याकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे. अशी मागणी प्रशांत जाधव यांनी केली आहे
अन्यथा पंचक्रोषी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा या अर्जाद्वारे देत आहे येथून पुढे अपघात झाला तरी होणा-या जिवित हानीस प्रशासन जबाबदार राहणार का.पुलावरती लाईट नाही,पुलाच्या दोन्ही तटबंदीवर मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे उगविली आहेत तरी या सर्व गोष्टींचा विचार करुन आमच्या मागण्या मान्य कराव्या.







