सातारा जिल्हा परिषदेला अस्वच्छतेचा विळखा

26
Adv

स्वच्छता अभिमान राबवण्याच्या सूचना देणाऱ्याजिल्हा परिषदेच्या co याशनी नागराजन यांच्या मुख्य कार्यालयातच अस्वच्छतेचा विळखा पडलेला दिसून येतो ग्रामविकासमंत्री अथवा पालकमंत्री यांच्यासमोर आमचा कारभार स्वच्छ असतो असा देखावा आणणारे मुख्याधिकारी नागराजन मॅडम यांना कार्यालयात फेरफटका मारण्याची गरज असल्याचे दिसून येते

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री महोदय यांनी दिला या यामध्ये ग्रामविकास विभागाचा स्वच्छते बाबतीत नंबरही आला मात्र ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्ह्यातच जिल्हा परिषदेमध्ये अस्वच्छतेचा कळस पाहायला मिळतो खिडक्यांमधून गुटखा तंबाखू पान थुकून नुकत्याच रंगरंगोटी केलेल्या पांढऱ्या भिंती लाल केलेल्या दिसून येतात

जिल्हा परिषदेमध्ये अंतर्गत सीसीटीव्ही कार्यरत असून जे कोणी असे कृत्य करेल त्यावर दंडात्मक कारवाई करावी व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची असून संबंधित कर्मचाऱ्यांनी थुंकून घाण करणाऱ्या वर सीसीटीव्ही बरोबर माणसांचा हि वॉच ठेवणे गरजेचे आहे

Adv