पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

26
Adv

सातारा जिल्हयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एक रकमी रु. २५ हजार व ५० हजार विशेष गौरव पुरस्कार तसेच ज्या माजी सैनिक, विधवांचे पाल्य सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी ९० टक्के व १२ वी बोर्डाच्या परिक्षेमध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असतील अशा पाल्यांना एक रकमी रु. २० हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
तरी अशा माजी सैनिक,पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Adv