खबरदार…झाडे तोडू नका.- मदन साबळे

97
Adv

राज्यात रस्त्याच्या विकासासाठी दुतर्फा असलेल्या बहरलेल्या झाडांची कत्तल केली जात आहे.कामाच्या निविदेत तोडलेली झाडे पुन्हा लावण्याची अट घातलेली असते. मात्र ती पाळली जात नसल्याचे उघड आहे. आता लोणंद ते सातारा रस्ता ९६५ डी हा नव्याने विकसित होणार असल्याने दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल केली जाण्याची शक्यता आहे. मात्र ही झाडे न तोडता रस्ता करावा, अशी मागणी निसर्ग वाचविण्याची धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. तरी ही झाडे तोडण्याचा प्रयत्न केला तर खबरदार, अन्यथा गांधीगिरी ते न्यायालय लढाई लढणार असा इशारा, सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात रस्ते विकास करताना आजपर्यंत शेकडो वर्षे वाहनधारकांना सावली देणारी झाडे अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करून त्यांची कत्तल केली जात आहे. शासन, सामाजिक कार्यकर्ते,गावोगावी निसर्ग वाचविण्याची शक्य तिथे झाडे लावली जात आहेत. अहोरात्र मेहनत करून या झाडांचे संवर्धन केले जाते. तर रस्ते विकासाच्या नावाखाली आजपर्यंत निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये मध्ये तोडलेली झाडे पुन्हा नव्याने लावण्याची शर्त असते. तरीही झाडे लावली जात नसताना ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही. हे वास्तव संतापजनक आहे.

आता सातारा ते लोणंद हा राजमार्ग विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या दरम्यान असलेली शेकडो वर्षांपासून उभी असणारी वृक्षसंपदा उध्वस्त होणार आहे. यामुळे निसर्गावर प्रेम करणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी या झाडांचे संवर्धन करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर मानवी जीवन उध्वस्त होऊ शकते, असे असताना याबाबत ना शासन गांभीर्याने विचार केला पाहिजे.

लोणंद ते सातारा रस्ता विस्तारीकरण करताना रस्त्यालगत असलेली झाडे न तोडता विस्तारीकरण करावे. अन्यथा गांधीगिरी मार्गाने आंदोलन ते न्यायालयीन लढा देण्यासाठी तयार असल्याचे मदन साबळे यांनी राजमार्ग प्राधिकरणाला इशारा दिला आहे.

विकासाच्या नावाखाली संवेदनशील क्षेत्र हटविले जात आहे. तोडली जाणारी झाडे टिकविणे गरजेजे आहे.निसर्ग हटवून कोणताही विकास नको
सातारा लोणंद रोड ९६५डी या
रस्त्याच्या रुंदीकरणात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तसेच छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गाचा वापर करीत असत हा ऐतिहासिक मार्ग आहे शेकडो वर्षांपूर्वीच्या जुने वृक्ष हटविले जाणार आहेत.याविरोधात सातारा लोणंद वरील गावे व वृक्ष प्रेमी एकवटले आहेत. ही निसर्ग संपदा हटवू नये या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुद्धा या ग्रामस्थांची आहे

जुनी झाडे तोडून होणारा विकास आम्हाला नको.तिथे राहणारे पक्षी जीव जंतू आणि आमचा श्वास तोडला जात आहे.विकासाच्या नावाखाली निसर्ग भकास करून नव्याने कोणताही रस्ता होणार नाही.त्याला आमचा सर्वांचा विरोधच राहील
हटविली जाणारी सर्व झाडे ही देशी प्रकारातली आहेत. या झाडांवर प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. झाडे हटविल्यास त्याचा मोठा परिणाम वातावरणाच्या बदलावर होईल. परिसरातील पाण्याची भूजल पातळी घटेल. शेती उत्पादनावर परिणाम होईल रस्ता रुंदीकरणामुळे आजूबाजूची शेती आणि छोटे छोटे व्यवसाय अडचणीत येतील. ज्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. यामुळे झाडांचे संवर्धन व व तसेच या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व पुल जतन करण्यात यावी ही या ग्रामस्थांकडून मागणी होत आहे व रस्त्याचे काम करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू इशारा. दिला आहे,…

Adv