आज केंद्रसरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे ही घटना निश्चितच स्वागतार्ह आहे अशी तातडीची प्रतिक्रीया खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
. जातनिहाय गणना होत नसल्याने, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होत होती. आता प्रत्येक जातीची स्वतंत्र जनगणना होवून त्यानुसार सांख्यिकी तथ्ये निश्चित होतील. त्याचा लाभ सामान्य जनतेला मिळेल. कमी लोकसंख्येच्या जातींबरोबरच बहुसंख्य जातींना लोकसंख्येच्या समतुल्य प्रमाणात सामाजिक आणि शासकीय लाभ मिळु शकतील. एक धाडसी आणि दूरगामी परिणामकारक निर्णय घेतल्याबद्दल केंद्रशासनासह या प्रक्रीयेत योगदान देणारे प्रत्येकजण हे अभिनंदनास पात्र आहेत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेत नमुद केले आहे.