Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पुतळा प्रकरणावरून संघटनांकडून पालिका प्रशासन वेठीला

पुतळा प्रकरणावरून संघटनांकडून पालिका प्रशासन वेठीला

265
Adv

सातारा शहरातील शाहू चौक येथे साहित्यरत्नशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे काम सुरू आहे .या कामाच्या संदर्भात काही संघटनांकडून मुद्दाम राजकारण केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे .या निमित्ताने काही संघटना प्रशासनाला वेठीला धरण्याचा प्रकार करत आहेत असा आरोप सामाजिक संघटनांच्या वतीने होत आहे या प्रकरणाचे गांभीर्य विनाकारण काही व्यक्तींकडून वाढवले जात असून त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे

सातारा शहरात शाहू चौक येथे काही वर्षांपूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा होता .या ठिकाणी अर्धा कृती पुतळा काढून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याचे काम प्रगती पथावर आहे या कामाचे रीतसर निविदा काढण्यात आली आहे या ठिकाणचा अस्तित्वातील अर्धा पुतळा संरक्षित वातावरणात आणि पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने काढण्यात आलेला आहे आणि तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे ताब्यात द्यायचे आहे असे कळविण्यात आले आहे सदर पुतळ्याचा चार अँगल मध्ये फोटो व साईज त्याचे माध्यम याबाबतची माहिती प्रमाणित आहे पुतळ्याची उंची 0.95 मीटर रुंदी 0.75 मीटर असून हा पुतळा ब्रांझ धातूचा आहे .

गेल्या तीन वर्षापासून पालिकेचा कारभार हा प्रशासन म्हणून मुख्याधिकारी अभिजीत बापट हे सुस्थितीत चालवत आहेत मात्र काही विघ्न संतोषी लोकांना हे बघवत नाही

कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नगरपालिका प्रशासनाला वेठीस धरू नये.. पालिका प्रशासनाने वेळोवेळी पुतळ्याबाबत कागदोपत्री कामकाज केले आहे , आक्षेप होते तर यापूर्वी संबंधितांनी आवाज उठवायला हवा होता तेव्हा का आवाज उठवला नाही, स्वार्थी पोळी भाजली नाही की प्रशासनल वेठीस धरण्याचे उद्योग बंद करावेत

महापुरुषांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा डाव गणेश वाघमारे वारंवार करत असून प्रशासनानेच असल्या
माहिती न घेऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जुना पुतळा आता साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संघर्ष ठेवण्यात येणार असल्याने याची देखभाल सुद्धा शासनच करणार असून सातारा पालिके मार्फत याची रीतसर कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र जेव्हा या पुतळ्याच्या बाबतीत निविदा प्रसिद्ध झाली त्यानंतर पुतळा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होतांना माजी नगरसेवक अमर गायकवाड हे तेथे उपस्थित होते तेव्हा त्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही मात्र कालांतराने पालिका व प्रशासनाचे प्रमुख मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यावर विनाकारण टीका सुरू ठेवली

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान प्रशासनाने केलाच पाहिजे यात कोणाच्या मनात तीळ मात्र शंका नाही मात्र जाणून बुजून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे नाव घेऊन प्रशासनाला बदनाम करायचं हा राजकीय हेतूचाच एक भाग असल्याचे दिसून येत आहे

या पुतळा प्रकरणावरून मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या विरोधात काही संघटनांनी निवेदन देऊन तक्रार दिली होती तसेच काही सामाजिक कार्यकर्ते या विषयावरून धरणे आंदोलनाला बसले आहेत ज्या विषयांमध्ये सर्व अटी व शर्ती पुरेपूर पाळण्यात आल्या आहेत तेथे अशा कार्यकर्त्यांच्या मूळ आंदोलनाविषयी शंका उत्पन्न होत आहे या पुतळ्याच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका हे खरे वादाचे मूळ कारण आहे असा आरोप आहे त्यावरूनच काही प्रतिष्ठित धेंडांमध्ये रुसवा फुगवी होऊन हे प्रकरण आंदोलनाच्या कोर्टात गेले आहे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा साहित्यिक आणि समाज सुधारक म्हणून मोठ्या उंचीवर आहे त्या पुतळ्याच्या आडोशाने केवळ ठेका मिळत नाही म्हणून प्रशासनाला सवाल करणे आणि त्यामागून आपला हेतू साध्य करून घेणे असे काही प्रकार होणार असतील तर त्याचा आम्ही निषेध करत आहोत अशा प्रतिक्रिया संघटनेतल्याच काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिले आहेत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची कसून चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणाचा स्वयंस्पष्ट स्पष्ट अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवावा अशी मागणी होत आहे .

सातारा पालिकेच्या वतीने दिनांक 12/ 8 /2024 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जुना पुतळा हा हलवण्यात येणार असून याबाबत जाहीर निवेदन ही पालिकेच्या वतीने विविध दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते याबाबत आपली कोणाची तक्रार किंवा हरकत असेल तर ती सातारा पालिकेकडे कळवावे अशी जाहीर निविदा प्रसिद्ध केल्यानंतर कोणाची हरकत व तक्रार आली नाही त्यानंतर पालिकेने आपले काम सुरु ठेवले आत्ताचे उपोषण करते गणेश वाघमारे त्यावेळेस कुठेही या प्रक्रियेमध्ये नव्हते आता हा पुतळा छत्रपती शिवाजी संग्रहालयाकडे वर्ग होणार असल्याची चाहूल लागताच? उपोषण सुरू केले उपोषण करणे गैर नसून मात्र एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती नसताना आपण आंदोलन व उपोषण करने चुकीचे असल्याचे बोलले जात आहे

Adv