धैर्य गेलेला दादा झाला सेटलमेंट बहादुर

1589
Adv

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत असली तरी या तालुक्यातील ज्येष्ठ नेते व कारखान्याचे संस्थापक सदस्य आबासाहेब पार्लेकर व भिकू lनाना किवळकर, बाबासाहेब चोरेकर यांनी हा कारखाना उभा केला मात्र या कारखान्यावर एकाच कुटुंबाची जास्त काळ सत्ता असल्याने येथील सभासदांनी परिवर्तन करण्याचा एकच ध्यास घेतला आहे

लोकसभा विधानसभा नंतर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे आडवा पाय घालून राजकीय क्षेत्रात अपयशी ठरलेला जिल्ह्यातील धैर्य गेलेल्या दादाला स्वतःचा कारखान्याच्या उसाची गोडी नीट टिकवता आली नाही आणि हा सेट. .ल..मेंट बहाद्दूर तिसरी आघाडी करून स्वतःच्या हितासाठी दंड थोपटून कारखान्याची निवडणुकीत उतरला आहे

जिल्ह्यातील एका पक्षाच्या धैर्य गेलेल्या दादाने पक्षाच्या विरोधातील माजी आमदार यांच्या बंधूंबरोबर मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन केली असल्याची चर्चा कराड तालुक्यात रंगत आहे ( सेट..ल..मेंट बहाद्दूर..) विद्यमान भाजपच्या आमदारांकडे अतिशय मोठ्या फरकाच्या मतांच्या विजयाने कारखाना आला असता आता मात्र कमी फरकाने विद्यमान कारखान्यात सत्तांतर होणार हे त्रिवार शक्य असले तरी असल्या प्रवृत्तींवर कुठल्या देवा भाऊचा आशीर्वाद आहे अशी चर्चाही कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात रंगत आहे

दोन वेळा मुख्यमंत्री व महाराष्ट्रातील चाणक्य म्हणून ज्यांची ओळख असलेल्या देवा भाऊला आपल्या गोपनीय यंत्रमार्फत या सर्व गोष्टी कळत नसल्या तर जिल्ह्यातील गोपनीय यंत्रानेला बूस्टर डोस देण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे देवा भाऊ तुम्ही पुन्हा आला असला तरी तुमचे जिल्ह्यातील गोपणी यंत्रणा तुमच्याबरोबर पुन्हा आली का हे एकदा तपासा

Adv