
ऐतिहासिक वाघनखे बघण्यासाठी नागरिक गर्दी करत असून चप्पल व बूट बाहेर काढण्याचा सूचनाफलक दारावर लावला असून चक्क याच फलकाचा पुरात्व विभागाचे अधीक्षक असलेल्या प्रवीण शिंदे यांना विसर पडला असल्याचे दिसून येते
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघ नखे व शस्त्र बघण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी होत चालली आहे नियम शिस्त हे सर्वांना प्रशासनात सारखे असतात मात्र काही कर्मचारी यांना या संग्रहालयात वेगळे नियम असल्याचे दिसून येते दस्तूर खुद्द पुरात विभागाचे अधीक्षक प्रवीण शिंदे यांनाच संग्रहाल याच्या बाहेर लावलेल्या फलकाचा विसर पडला असल्याचे दिसून येते
दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी तंतोतंत म्हण या अधीक्षक यांना लागू होत आहे यात शिंदेंच्या मागे बऱ्याच हस्तींचा वरदा हस्त असल्याची चर्चा साताऱ्यात रंगते मात्र स्वतः नियम करून ते पायाखाली कसे तुडवावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुरातन विभागाचे प्रवीण शिंदे