Friday, June 5, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली

नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली

237
Adv

राज्यात 8 तारखेला महायुतीची पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकंच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राला 2 सभा दिल्या आहेत. त्यापैकी, नाशिकला एक आणि धुळ्याला एक सभा होईल, मोदींच्या या दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक होतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. नाशिकच्या ग्राउंडला तर मोदी ग्राउंड नाव दिले आहे, येथे लाखोंची सभा होईल, असेही महाजन यांनी सांगितले.

भाजपने केंद्रीयमंत्र्यांनाही महाराष्ट्राच्या प्रचारयंत्रणेत उतरवले आहे. त्यामुळे, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेल्या केंद्रातील नेत्यांच्याही सभा होणार आहेत. त्यातच, नरेंद्र मोदी हेही महाराष्ट्रात जास्त वेळ देतील, नाशिकला अजिबात दुर्लक्ष केलं नाही. याशिवाय, धुळ्याला, नंदुरबारलाही जाणार आहेत. अहमदनगरसह 5 जिल्ह्यांत मोदींच्या सभांचं दौऱ्याचं नियोजन असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

Adv