Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City गणेश आगमन सोहळ्याला व्यापाऱ्यांचा विरोध नाही

गणेश आगमन सोहळ्याला व्यापाऱ्यांचा विरोध नाही

1479
Adv

साताऱ्यातील गणेश आगमन सोहळ्याला कोणत्याही व्यापारी वर्गाचा विरोध नसून साताऱ्यातील गणेश मंडळ व व्यापारी यांच्यात एक गैरसमज निर्माण झाला असून या गैरसमज बद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत असल्याचे निवेदन साताऱ्यातील खण अळी येथील व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना दिले आहे

मात्र साताऱ्यातील एका व्यापाऱ्याने गेल्या एक महिन्या पूर्वी आपल्या गणेशाचे आगमन मोठ्या दिमागात पार पडले यानंतर काही मंडळांना आगमन सोहळा सिस्टीम,dj ला परवानगी नाकारल्याने वाद उफाळून आला.पोलिसांनीही एक प्रकारे या गणेश मंडळांवर अन्याय केला अशी भावना काही गणेश मंडळातील भक्तांनी व्यक्त केली गेल्या एक महिन्यापूर्वी या व्यापाऱ्याला कोणाचे अभय होते ते एक महिन्यापूर्वी यांना परवानगी दिली होती पोलिसांनी मंडळाचे कान टोचायचे ऐवजी या व्यापाऱ्याचे कण टोचले असते तर व्यापारी व गणेश मंडळ यांच्यात गैरसमज झाला नसता

गेल्या २,३दिवसापासूनसर्व गणेश भकतामध्येव्यापारी वर्गाबद्दल काही गैरसमज निर्माण झालेला आहे.तो गैरसमज काही समाजमाध्यमीनी जुने फोटो प्रसारितकेल्यामुळे झालेला आहे खर तर तो फोटो हा सर्व व्यापारी-वर्गानी बदलापुर येथे झालेल्या दुर्देवी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन देतानाचा आहे. परंतुसमाजमाध्यमातुन चुकुन तो फोटो प्रसारित झाल्याने
सर्वांचा गैरसमज झालेला आहे..साताऱ्यातिल कोणत्याही व्यापारी वर्गाचा गणेश-मिरवणूकीसाठी तसेच आगमन सोहळा, पारंपारिक वाद्यअथवा dj अश्या कोणत्याही गोष्टीला विरोध नव्हताकधिही रहाणार नाही.कारण व्यापारी वर्ग देखिल
गणेश भक्तच आहेत त्यांची देखिल सर्वान प्रमाणेगणपती देवतेवर नितांत श्रद्धा आहे.व तरी गेल्या 2,3 दिवसान पासून सर्व गणेश भकतामध्येव्यापारी वर्गाबद्दल झालेला गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानेव गणेश उत्सव आनंदात साजरा करण्याच्या हेतूने प्रस्तुत चे निवेदन आहे.यदा कदाचित व्यापारी वर्गाकडून
कोणत्याही गणेशभक्ताच्या भावना दुखावल्या गेल्या-असल्यास त्या बाबत सर्व व्यापारी वर्ग दिलगिरी व्यक्त करित असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले ..

Adv