स्थानिक कार्यकर्त्याच्या मागणीनुसार हे काम मंजुर- मकरंद पाटील

536
Adv

महाबळेश्वर सालोशी येथील वळवीवस्तीवर विद्युतीकरण करणे हे काम जिल्हा नियोजन आराखडया अंतर्गत् सालोशी उपसरंपच विठ्ठल मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्याच्या मागणीनुसार हे काम मंजुर केले होते. या लाईनमुळे आजुबाजुच्या गावातील लोकांना रोहित्र बसविल्यास विजेचा व पाण्याचा प्रशन सुटण्यास मदत होणार आहे. सदचे पत्र हे विद्युतीकरणासाठी दिलेले असून यामध्ये मी याकामासाठी किती रक्क्म लागणार आहे हे नमुद केले नव्हते .सदरचे अंदापत्रक हे संबंधीत अधिका-यांनी करावयाचे असते.यामधून कोणा एका व्यक्तीचा फायदा व्हावा असा माझा कोणताही हेतु नव्हता.चंद्रकांत वळवी या इसमाशी माझा कोणताही संबंध नाही.लोकप्रतिनिधीनी शिफारस पत्र दिल्यानंतर संबंधीत गावाची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करणे प्रशासनाचे आणि अधिका-यांचे काम असते.

सामान्य जनतेला न्याय मिळावा या हेतुने दिलेला पत्राचा कोणीही राजकारणासाठी वापर करु नये. या प्रकरणी कोणीही देाषी असल्यास त्याच्यावर कार्यवाही करावी.माझे कोणाशी कसलेही हितसंबंध गुंतलेले नाहीत.मी फक्त जनतेच्या हिताचा विचार करुन कामे करीत असल्यामुळे माझी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे असे स्प्ष्टीकरण आ मकरंद .पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेवुन कोणीतरी बेच्छुट आरोप केले आहेत. वास्तविक विविध कामासांठी त्या-त्या भागातील कार्यकर्ते विविध प्रशन आणि कामासाठी शिफारस पत्र मागत असतात.लोकांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने अशी पत्रे दिली जातात.लोकांचे प्रशन तात्काळ सुटावेत असा सदहेतु त्या पाठीमागे असतो. माझ्या मतदारसंघात अनेक छोटया -छोटया लोकवस्तीची गावे आहेत. येथील कार्यकर्ते नेहमीच माझ्याकडे विकासकामासाठी पाठपुरावा करत असतात. कार्यकर्त्याच्या मागणीनुसार अशी पत्रे देत असतो.त्यातुन झालेल्या विकासकामाचा फायदा किंवा गैर फायदा कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घेत असेल तर त्याची माहीती प्रशासनाने घेतली पाहीजे जे चुकीचे असेल ते नाकारण्याचा अधिकार प्रशासनाला आहे.त्यामुळे चुकीचे काही घडले असल्यास प्रशासकीय अधिका-यावर कार्यवाही करावी.आमचा कोणताही बेकायदेशीर कामाशी कोणाताही संबंध नाही.असे ही आ.पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

चौक्ट :- सालोशी येथील उपसरंपच श्री.विठ्ठल् मोरे म्हणाले की सालोशी येथे वळवीवस्ती असून या ठिकाणी सहा घरे आहेत.या विद्युत लाईनमुळे रोहित्र बसविल्यास परिसरातील दोन-तीन गावातील लोकांना जी विहीरीवरुन पाणी आण्यासाठी मोठी पायपीठ करावी लागते.ती लोकांची गैरसोय दुर होण्यास मदत होणार आहे. मी व ग्रामस्थ आमदार मकरंद पाटील यांच्याकडे कामाची मागणी करण्यासाठी गेलो होतो. त्यानुसार आ.पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे शिफारस केली आहे.

Adv