अखेर छत्रपतींनी राखले दिल्लीचेही तक्त

972
Adv

रात्री उशीरा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. तब्बल 3 तास बैठक चालली.या बैठकीत सात राज्याच्या जागांवर चर्चा झाली असल्याचे समजते बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी बैठक झाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार छ उदयनराजे भोसले या पाच नेत्यांमध्ये जवळपास ३० मिनिटे चर्चा झाली.त्यानंतर अमित शाह,छ उदयनराजे भोसले,अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.अखेर छ उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार छ उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील अशी सरळ लढत होणार आहे.

Adv