धैर्यशील मोहिते पाटील प्रचाराच्या कुटुंबासह मैदानात

454
Adv

लोकसभेच्या उमेदवारीबाबत अजूनही निर्णय झाला नसला तरी याठिकाणचा तिढा कायम आहे.असे असताना धैर्यशील मोहिते पाटील हे आता प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांच्या पत्नी व शिवतेजसिंह मोहिते पाटील प्रचारासाठी बाहेर पडल्याचे दिसून येते त्यामुळे मोहिते पाटील आता माघार घेणार नसल्याचे दिसत आहेभाजप कडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता आपला प्रचार सुरू केला आहे.धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरूवात केली.

गुरुवारी धैर्यशील यांच्या पत्नी शितलादेवी मोहिते पाटील या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढार चिंचोली, कात्रज,टाकळी,कुंभारगाव,सावेडी,दिवेगव्हाण,राजुरी पोन्धवडी, विहाळ आणि कोर्टी या गावातील विविध मंदिरात जाणार असून येथे त्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.तर धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील हे गुरुवारी माढा तालुक्यातील वाकावं,माढा,उंदरगाव,कापसेवाडी,माने गाव,धानोरे आणि कुर्डुवाडी या गावांचा दौरा करणार आहेत.

Adv