Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City मनसेच्या लेटर पॅडचा वापर लक्ष्मी दर्शनापुरता

मनसेच्या लेटर पॅडचा वापर लक्ष्मी दर्शनापुरता

356
Adv

सातारा नगरपालिकेत मनसेच्या वतीने आतापर्यंत असंख्य तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले मात्र या तक्रारी अर्जाचे पुढे काय झाले की लक्ष्मी दर्शन होऊन अर्ज काढले गेले हे सातारकराना कळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित झाला आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा शहरासह जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या वतीने सातारा पलिकेत असंख्य तक्रारी अर्ज दाखल केले गेले तक्रार दाखल झाल्यानंतर काही दिवसात लक्ष्मीचे दर्शन झाले की पदाधिकारी संबंधित पक्षाच्या लेटर पॅडकडे बघतही नाहीत अशी कुजबूज सातारा पालिकेत ऐकवायला मिळते मग नक्की आपण आपल्या पक्षाचा उपयोग फक्त लक्ष्मी दर्शनासाठी करतोय की पक्ष वाढवण्यासाठी करतोय याची जाणीव संबंधित पदाधिकाऱ्यांना राहिली नसल्याचे दिसून येते अशा जिल्ह्यासह शहरातील पदाधिकाऱ्यांवर पक्षाचे मुख्य अध्यक्ष असलेले राज साहेब ठाकरे कारवाई करणार का याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विविध आंदोलनाने प्रसिद्ध आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने काही आंदोलने समाजातील नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरली मात्र अलीकडच्या काळात काही पदाधिकारी आपल्या लेटर पॅडचा वापर फक्त लक्ष्मी दर्शनासाठीच करताना दिसून येतात यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे

Adv