राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले. त्यानंतर या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी रायगडावर शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचे अनावर करण्यात आले. अशात आता यावरून राजकीय नेते प्रतिक्रिया देतांना दिसत आहे.
मनसे प्रमुख राज्य ठाकरे यांनीही यावरून शरद पवारांवर टीका केली आहे. राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचं लॉन्चिंग रायगडावर केले त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, ‘तुतारी चिन्ह मिळालं मग फुंका, मी काय करू त्याचं?
असा प्रश्न विचारत ते पुढे म्हणाले,’ जर तुम्हाला आठवत असेल तर मी मुलाखतीतही शरद पवारांना प्रश्न विचारला होता. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. कारण शिवछत्रपतींचे नाव घेतले तर मुस्लिमांची मते जातात अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना काहीतरी आठवलं असं राज ठाकरेंनी सांगितले.






