छत्रपती उदयनराजेंच्या वाढदिवसाची साताऱ्यात तयारी

897
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाची साताऱ्यात तयारी सुरू झाली असून सातारा शहरातील तब्बल 25 चारचाकी वाहनांवर वारसदार या टॅगलाईनने सर्वांचे लक्ष वेधले आहे

छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज असलेले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस सातारकरांसाठी एक पर्वणीच असते साताऱ्यातील काही युवक कार्यकर्त्यांनी वारसदार या नावाचे आपल्या चारचाकी वाहनांवर फ्लीमिंग करून सर्वांचे लक्ष वेधले आहे श्री छ उदयनराजे भोसले यांची युवकांमध्ये प्रचंड क्रेझ असून महाराष्ट्रातील तरुणाई छउदयनराजें साठी जीव की प्राण लावायला तयार असते या युवकांवर श्री छ उदयनराजे भोसले ही तेवढेच प्रेम करताना दिसून येतात

खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची महाराष्ट्रातील तरुणाईंच्या मनात एक आगळवेगळीच क्रेज निर्माण झाली आहे कॉलर उडवण्याची स्टाईल असो,अथवा इतर कोणतीही स्टाईल युवकांच्या मनावर आजही राज्य करताना दिसून येते

Adv