Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City निलेश मोरेना जिल्हा नियोजन समितीतून डावलले

निलेश मोरेना जिल्हा नियोजन समितीतून डावलले

824
Adv

गुहाटी ते मुख्यमंत्रीपद याचे साक्षीदार असलेल्या निलेश मोरे यांना जिल्हा नियोजन समितीतून डावल्याने सातारा शहर शिवसेनेत नाराजीचा सूर पसरला आहे येत्या काही दिवसात योग्य नाही मिळाला नाही तर शिवसेनेचा राजीनामा देणार असल्याचे काही शिवसैनिकांनी खाजगीत सांगितले

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सातारा शिवसेना प्रमुख निलेश मोरे यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडतून डावल्याने सातारा शहरात शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा गुहाटीला गेले होते तेव्हापासून ते मुख्यमंत्री प्रवासापर्यंत निलेश मोरे हे त्याचे साक्षीदार होते हस्ते पर हस्ते निलेश मोरे यांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांना त्यावेळेस नक्कीच झाली सातारा शहरात पक्ष वाढीसाठी निलेश मोरे यांनी योगदान देऊन भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे धनुष्य उचलून पक्ष संघटना बळकट्टीकरण केले सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर स्वार्थापुटी काही आपली मागे पडलेली राजकीय कारकीर्द सुरू केली अशा काही थोर व्यक्तींना स्थान दिल्याने सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

योग्य न्याय मिळाला नाही तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितले प्रत्येक वेळेस आंदोलन करायची केसेस अंगावर घ्यायच्या आणि जेव्हा फळ खायची वेळ येते तेव्हा आयत्या पिठावर रेगोटे मारणारे यांना त्याची चव चाखायला मिळत असल्याने शिवसैनिक प्रचंड नाराज झाले असून येत्या काही दिवसात मनासारखे नाही झाले तर शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याचे शिवसैनिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले

Adv