मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्ष वाढीचे धनुष्य पेलण्यास जिल्हाध्यक्ष ठरले अपयशी

575
Adv

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी जिल्हाध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याप्रकरणी लक्ष देणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

गेले दीड वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिन्ह व पक्ष म्हणून मान्यता दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्रात उमटवला असून सातारा जिल्ह्यात मात्र याउलट परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येते त्याला कारण ही तसेच आहे की जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कुठेही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताना दिसून आले नाहीत फक्त मुख्यमंत्री त्यांच्या दरेगावी आले की फोटोसेशन करण्यात काही पदाधिकारी पुढे पुढे करताना आपल्याला दिसून येतात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिवसेनेचे धनुष्य पेलण्यास जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी सपशेल अपयशी ठरले असल्याचे चित्र दिसून येते

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या वैद्यकीय व इतर विविध कामाच्या रूपाने महाराष्ट्रसह देशात ठसा उमटवला आहे मात्र त्यांच्या जिल्ह्यात जर पक्ष वाढत नसेल तर पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे काय सल्ला देणार कि दुर्लक्ष करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी हे फक्त फोटोसेशन बॅनरबाजी यातच वर्षभर गुंतून पडलेले दिसतात कुठेही समाजकार्य करताना सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देताना शिवसेनेचे पदाधिकारी दिसला नसल्याने नागरिकाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

Adv