अमृत 2.0 अभियानांतर्गत 74 कोटी 78 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास शासनाची मंजूरी

391
Adv

केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0अभियानांतर्गत सातारा नगरपरिष देच्या 74 कोटी 78 लाख रुपयांच्या पाणीपुरवठाआधुनिकीकरण प्रकल्पास राज्यशासनाची प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.

या प्रकल्पाव्दारे आधुनिक पाणीमिटर बसवणे,शहापूर
येथील जॅकवेल,जकातवाडी व सांबरवाडी येथील जलशुदृधीकरण केंद्रे स्वयंचलित करणे, सातारा शहरातील पाण्याच्या 18 टाक्या स्वसंचलित प्रणाली व्दारे नियंत्रित करणे. शाहुपूरी भागासाठी अतिरिक्त नवीन पाणी वितरण व्यवस्था साकारणे, पॉवरहाऊस ते माची अखेर नवीन गुरुत्वाकर्षण वितरण व्यवस्था करणे या कामांचा समावेश आहे. कासच्या मुबलक पाण्याबरोबच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शुध्द आणि स्वच्छ पाणीपुरवठा होणे व एकंदरीत पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी वरील प्रकल्प सातारकरांसाठी राबविला जाणार आहे.

सातारा नगरपरिषदेमार्फत आधुनिक पध्दतीचे मिटर बसवणे, सांबरवाडी, जकातवाडी येथील एकूण तीन युनिट मधील वॉटरट्रीटमेंट प्लॅन्ट स्वयंचलित करण्याबाबत तसेच शाहुपूरी साठी अतिरिक्त नवीन वितरण नलिका व्यवस्था, या महत्वाच्या बाबींसह पॉवर हाऊस ते माची अखेर गुरुत्वनलिका टाकणे इत्यादी विकास कामे आणि त्यानुसार अन्य अनुषंगीक कामांचा यश इंजिनिअरिंग कन्सल्टंट प्रा.लि. नवी मुंबई, यांनी बनविलेला पाणीपुरवठा आधुनिकीकरणाचा 74 कोटी 78 लाख रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रपुरस्कृत अमृत 2.0 योजनेमधुन प्रस्तावित केला होता. या प्रस्तावाचा समावेश असलेला राज्य जलकृती आराखडा राज्याने केंद्राकडे सादर केल्यानंतर त्यास केंद्राने मान्यता दिली आहे. 74.78 कोटींच्या प्रकल्प किंमतीपैकी 24.92 कोटीरुपये केंद्रशासन, 51.64 कोटी राज्यशासन आणि सातारा नगरपरिषदेचा रुपये 11.22 कोटींचा हिस्सा राहणार आहे.

या पाणीपुरवठा प्रकल्पास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता दिलेली असून, अमृत 2.0
या अभियानांतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीच्या 10 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत प्रस्तावाच्या तांत्रिक मान्यतेस मंजूरी मिळाली.
याकामी आम्ही दि. 30 जानेवारी 24 रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेवून, सदर प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी देण्याची विनंती सूचना केली होती. त्यानुसार मा.ना. एकनाथ शिंदे यांनी आमच्या सूचनेची लगोलग दखल घेवून, सातारा नगरपरिषदेच्या सुमारे 75 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा आधुनिकीकरण प्रस्तावास नगरविकास विभागाची प्रशासकीय मंजूरी प्रदान केलेबाबतचा शासननिर्णय दिनांक 31 जानेवारी 24 रोजी शासनाने निर्गमित केला आहे.

कासधरण उंची वाढवल्याने,पूर्वीपेक्षा पांचपटीने कास धरणातील पाणीसाठा वापरण्याजोगा उपलब्ध झाला आहे. तसेच कास धरण ते पॉवर हाऊस अखेर सुमारे 102 कोटींची अतिरिक्त जलवाहीनी टाकण्याच्या कामाला मंजूरी मिळून, ते काम सुरु झाले आहे.सातारकरांना अधिक शुध्द आणि स्वच्छपाणीपुरवठा होण्यासाठी स्वयंचलित फिल्टरेशन प्लॅन्ट,शाहुपूरीसाठी अतिरिक्त वितरण व्यवस्था,शहापूर येथे स्वयंचलित जॅकवेल, पॉवर हाऊस ते माची पेठ अशी अतिरिक्त गुरुत्व नलिका,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे LoRa सारख्या तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक वॉटरमिटरची व्यवस्था तसेच याबाबतची इतर अनुषंगीक कामे याकरीता सुमारे 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने कास मधुन होणाऱ्या स्वच्छ व मुबलक पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.त्यामुळे भविष्यातील सातारकरांची कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची चिंता भासणार नाही अशी कार्यवाही होणार आहे.

सदरचे काम सातारा नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार आहे. सातारकरांना मुबलक, स्वच्छ आणि शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांना,राज्याचे मा. मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.श्रीअजितदादा पवार,तसेच सातारचे पालकमंत्री ना.श्री.शंभुराज देसाई यांचे सहकार्य लाभल्याने, या सर्वांचे व्यक्तीश:आम्ही तसेच सातारकरांच्या वतीने आभार मानतो.

Adv