खासदार श्री छ उदयनराजे भोसले निकटवर्तीय व युवाशक्ती फाउंडेशन चे अध्यक्ष तसेच यशस्वी उद्योजक संग्राम बर्गे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र मुंबई येथे बर्गे यांना प्रदान करण्यात आले. बर्गे यांच्या या नियुक्तीमुळे भाजपची सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील युवा बांधणीला वेग येणार आहे
खासदार छ उदयनराजे भोसले यांचे समर्थक संग्राम दादा बर्गे हे 2006 पासून म्हणजे महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रीय आहेत . खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ते सातत्याने विद्यार्थी चळवळीमध्ये कार्यरत होते . महाविद्यालयीन जीवनापासून त्यांना सामाजिक कार्याचा ओढा होता. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया संघटनेचे त्यांनी सलग चार वर्ष सातारा जिल्हाध्यक्ष खा उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पद भूषविले .
शंभर टक्के समाजकारण, युवाशक्तीचे संघटन, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक या माध्यमातून सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संग्राम बर्गे यांनी युवा कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे . सातारा जिल्ह्यातही युवाशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून गोडोली विलासपूर सारख्या भागांमध्ये त्यांचे अनेक सामाजिक उपक्रम सुरू असतात . सातारा नगरपालिकेची डिजिटल शाळा, गोडोली येथे आयटी हब उपक्रमासाठी पुढाकार इनोव्हेटिव्ह सातारा तसेच गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी महिला बचत गट मेळाव्यांचे आयोजन विलासपूर येथे पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये पुढाकार अशा विविध उपक्रमांमधून संग्राम बर्गे यांनी आपल्या नेतृत्वगुणाची चुणूक दाखवली आहे
संग्राम बर्गे यांच्या कामाचा झपाटा पाहून खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष पंकज चव्हाण, काका धुमाळ, गणेश जाधव, सागर साळुंखे, संदीप शिंदे, प्रीतम कळसकर यावेळी उपस्थित होते
या निवडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,खासदार उदयनराजे भोसले, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळककर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, महामंत्री विक्रांत पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रिया ताई शिंदे, सातारा लोकसभा प्रभारी अतुल बाबा भोसले, प्रदेश सरचिटणीस विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, रामकृष्ण वेताळ सुनील काटकर, सागर शिवदास यांनी या निवडीचे अभिनंदन केले आहे .






