Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा कोणाचाही मुलाहिजा नाही

पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा कोणाचाही मुलाहिजा नाही

339
Adv

शुध्द, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेच्या प्रशासनाची आहे.प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून,अशुध्द आणि अपुरा,कमी दाबाने पुरवठा होत असेल तर ते निश्चितच क्लेशदायी आहे.नागरीकांच्या भावनांशी आणि जिवाशी खेळण्याचा हा प्रकार सहन होणारानाही.पाणी पुरवठा विभागातील संबंधीत अधिकारी आणि कर्मचा-यांनी तातडीने पश्चिम भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा कोणाचाही मुलाहीजा नाही असा इशारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसापासून, रामाचा गोट, मंगळवारपेठ, या भागातील नागरीकांना दुषित पाणीपुरवठा होत होता. यासंबंधी साविआने प्रशासनाला दखल घेवून सुयोग्य कार्यवाही करण्या बाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. तरी सुध्दा जर प्रशासन गेंडयाची कातडी पांघरुन बसली असेल तर अश्या अधिकारी / कर्मचारी यांना वठणीवर आणायला वेळ लागणार नाही असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की,सातारकरांना, मुबलक, पुरेश्या दाबाने, स्वच्छ आणि शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठीच कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. धरणापासून नवीन
अतिरिक्त पाईपलाईन देखील मंजूर करुन घेण्यात आलेली आहे.

कालच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठयाबाबत माहीती घेतली असता,फिल्टर केलेले पाणी सोडण्याऐवजी डेडस्टॉक मधील पाणी संबंधीत कर्मचारी यांनी सोडल्याचे समोर येत आहे. हे जर खरे असेल तर अश्या कर्मचा-यांना तातडीने निलंबीत केले गेले पाहीजे.जर प्रशासनाच्या गलथानकारभारामुळे पश्चिम सातारा परिसरात दुषित पाणीपुरवठा होत असेल तर ते निश्चितच निषेधार्य आहे. याबाबत या भागातील पाणीपुरवठयात तातडीने सुधारणा पाणीपुरवठा विभागाने करावी.पाणीपुरवठा
विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना जर झेपत नसेल तर त्यांनी आपली बदली करुन घ्यावी.प्रशासनाने दुस-या सक्षम अधिकारी कर्मचारी यांचेकडे कामकाज सोपवावे. प्रशासनाने याबाबती काय कारवाई केली आहे याची नागरीकांना माहीती दयावी. आपत्कालीन परिस्थितीत काहीही करा परंतु
पश्चिमभागातील जिव्हाळयाच्या पाणीपुरवठा सुरळीत आणि पुरेश्या दाबाने करण्याचे व्यवस्थापन कार्यक्षमपणे करा असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

पश्चिमभागातील विस्कळीत झालेला आणि दुषित पाणीपुरवठा होत आहे तो सुधारलाच पाहीजे परंतु त्याचबरोबरीने पावसाळयापूर्वी करावयाची सार्वजनिक कामे,आणि आरोग्य, लाईट,रस्ते याविषयीसुध्दा संबंधीतांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.नागरीकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकारकोणालाही नाही.नोकरी करताना बेजबाबदापणा आणि हलगर्जीपणा कोणी करीत असेल तर संबंधीतविभागाच्या अधिकारी कमचारी यांने बाबतीत मुख्याधिकारी प्रशासक यांनी बडगा उगारावा अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कानउघाडणी केली आहे.

Adv