सातारा जावली मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हुमगाव या गावी त्यांनी भाजपचे खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हार घालून स्वागत केल्याने एक प्रकारचे पुन्हा एकदा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे धक्का तंत्र सातारा जावली मतदारसंघात दिसून आले
सातारा जावली मतदारसंघात भाजपचे खा श्री छ उदयनराजे भोसले यांचे राजकीय दौरे विरोधकांना अस्वस्थ करणारे ठरत असून आज हुमगाव या गावी यात्रेनिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट दिली यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत भाजपचे खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हार पुष्प व शाल देऊन स्वागत केल्याने सातारा जावली मतदारसंघात दोघांचेही राजकीय विरोधक असलेले पुन्हा एकदा अस्थिर झाल्याचे दिसून येते
सातारा जावली मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केले होते की या मतदारसंघात नक्की चमत्कार घडेल त्यानंतर मोठ्या हालचालींना वेग आल्या असल्याचे दिसून येते आठ दिवसाच्या आतच भाजपचे खा श्री छ उदयनराजे भोसले पुन्हा जावली मतदार संघात गेल्याने विरोधक चांगलेच अस्थिर झाल्याचे दिसून येते आगामी काळात भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शशिकांत शिंदे यांनी ठरवले तर जावलीचा निकाल नक्की वेगळा लागू शकतो हेच या आजच्या भेटीवरून स्पष्ट दिसून येत असल्याचे राजकीय विश्लेषक यांचे म्हणणे आहे







