रयतेचे राजे उदयनराजे,…संग्राम बर्गे

141
Adv

कोणताही वाद संघर्ष आणि बेधडकपणा म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. सामान्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणाच्या कोणाच्याही अडचणीचे उत्तर म्हणजे उदयनराजे. ते म्हणजे एक भारदस्त उंचपुरे व्यक्तिमत्व, राजेशाहीचा धाक आणि रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे उदयनराजे. त्यांच्या आणि माझा संबंध एक कार्यकर्ता म्हणून आला आणि पुढे आम्ही एकमेकांच्या मैत्रीच्या प्रेमात कधी अडकलो हे कळलेच नाही.
सत्ता असो अथवा नसो पद असो अथवा नसो उदयनमहाराज भोवती कायम एक वलय राहिलेलं आहे. उच्च विद्या विभूषित इंग्रजी हिंदीवर प्रभुत्व आणि सातारी खेड्यातील मराठी भाषेत संवाद साधत राजे जाईल त्या परिसरात एक वलय निर्माण करतात. सर्वसामान्यांशी आणि जनतेशी त्यांचा थेट संवाद असतो. उदयनराजे म्हणजे एक संकट मोचक आहेत. कोणत्याही अडलेल्या कामावर महाराज साहेबांची मात्रा चुटकी सरशी इलाज करते.
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात त त्यांच्या वावर सहज असतो. ते अनेकदा शरद पवारांकडे मार्गदर्शन घेतात,शरद पवार उदयनराजेंच्या कायम पाठीशी राहिले आहेत.तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा त्यांच्या पाठीशी आहेत. छत्रपतींच्या घराण्याविषयी आणि त्यांच्या वंशाच्या विषयी दोघांनाही मोठा आदर आहे. आणि त्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अमितजी शहा वारंवार अभिमानाने करत असतात. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची आणि उदयनराजे यांची मैत्री सर्वश्रुत आहे, तशीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची चांगली घनिष्ठ मैत्री आहे.
तशीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची चांगली घनिष्ठ मैत्री आहे.
साताऱ्याच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे योगदान आहे. उदयनराजेंनी सुचविलेली अनेक विकास कामे त्यांनी मंजुर करून भरीव निधी विकास कामी दिला आहे.दोघांची मैत्रीही सर्वश्रुत आहे.
साताऱ्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी उदयनराजे यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.तशीच उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्याशीही आहे. अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांना साताऱ्याच्या प्रश्नांसाठी भेटतात, पाठपुरावा करतात. सर्व राजकीयपक्षांत त्यांचे मित्र आहेत. कोणताही राजकीय पक्ष त्यांना वर्ज्य नाही.त्यामुळे ते रोखठोकपणे मी कुणाला मानत नाही, जनता हाच माझा पक्ष, असं बेधडकपणे ते म्हणतात.
उदयनराजेंनी कधीच आपल्या राजेपणाची झूल पांघरली नाही की गर्व बाळगला नाही. त्यांचे प्रत्येक वर्तन सातारकरांना आवडते आणि त्यांच्यावर त्यांचे राज्यप्रातील चाहते कार्यकर्ते प्रेम करतात. आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब लोकांची फिकीर आणि काळजी कशी करायची याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे उदयनराजे. सर्वांनाच महाराज साहेब आपला माणूस वाटतात, नेमका हा माणूस कसा आहे याचा थांग पत्ता कोणाला लागत नाही. त्यामुळे सर्वसामान्या सारखे राहूनही ते वेगळे ठरतात. आपल्या कामाने त्यांनी जनतेच्या मनात वेगळे नाव कोरले आहे. राज्यभरात नव्हे तर देशभरात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. राजकारणातील अनेक खाचखळगे त्यांनी अनुभवले आहेत. सातारकरांना आधुनिक विकासाचे स्वप्न त्यांनी दाखवले आहे, त्यासाठी त्यांनी कामही सुरू केला आहे. सध्या सातारा शहर विकासात होत असणारे बदल त्याचेच फलित आहे. साताऱ्यात त्यांची स्वतःची कार्यकर्त्यांची फळी आहे. मागील वीस वर्षे त्यांची पालिकेवर सत्ता आहे. शहरातून त्यांनी एक फेर फरका मारला तरी वातावरण बदलून जाते. ते जातील तिथे काही सेकंदात मोठी गर्दी जमा होते. मग वेळ दिवसाची असो वा रात्रीची.
उदयनराजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत, ते युवकांचे, शेतकरी, कामकरी, शेतमजूर, महिला, उद्योजकांचे आधार आहेत. उदयनराजेंचा आधुनिक शेती, माहिती तंत्रज्ञान जलप्रदूषण त्याचे परिणाम, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान आदींचा मोठा अभ्यास आहे. साताऱ्यात औद्योगिक क्रांती घडविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी सतत पाठपुरावा ते करत असतात. सातारा शहर आणि उपनगरांच्या विकासालाही त्यांचे प्राधान्य आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील जनता या राजांवर प्रेम करते. त्यांचे बोलणे नेहमी स्पष्ट आणि रोखठोक ,बेधडक असते. कोणत्याही परिणामाचा विचारही ते करत नाहीत. आत एक आणि बाहेर एक असे त्यांचे कधीच नसते. जे असेल ते समोरासमोर, असंख्य नागरिक आपली गाऱ्हानी, वेदना, प्रश्न आणि अडचणी घेऊन जल मंदिरात जातात. त्यांना खात्री असते आमचे काम होणारच, हाच अतूट विश्वास जनतेचे प्रेम पाठबळ घेऊन सुरू असलेली खासदार उदयनराजे यांची वाटचाल आहे. म्हणूनच ते जनतेच्या मनातील रयतेचे राजे आहेत. त्यांना वाढदिवसा त्यांची कारकीर्द अशीच बहरत जावो, हीच वाढदिवसानिमित्त आई भवानीच्या चरणी प्रार्थना.
शब्दांकन:- विश्वास पवार

Adv