Wednesday, August 19, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पालिकेतील अजेंडा क्रमांक १९९ व २०० वरून खलबते?

पालिकेतील अजेंडा क्रमांक १९९ व २०० वरून खलबते?

138
Adv

सातारा पालिकेच्या अजेंड्यातील विषय क्रमांक १९९ व २०० यावरून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या विषयांच्या अनुषंगाने नगराध्यक्ष अमोल मोहिते, सभासचिव तसेच श्री. प्रभुणे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांच्या अँटीचेंबरमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि दैनिक सातारनामाने सातत्याने केलेल्या वृत्तांकनामुळे पालिका प्रशासनावर या विषयाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा दबाव वाढल्याची चर्चा आहे.

अजेंड्यातील विषय क्रमांक १९९ व २०० संदर्भातील निर्णय, अधिकार आणि प्रक्रिया याबाबत प्रशासनाने अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
या संपूर्ण घडामोडीत नगराध्यक्षांना अनुभवी मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, संबंधित विषयावर पालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Adv