शिवजयंती दिनी म्हणजे रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी पोवई नाका येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे . हे आयोजन खासदार श्री छ उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले असून शिवरायांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ही आरती संपन्न होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे
सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी असून तिला तब्बल 300 वर्षाचा दैदीप्यमान इतिहास आहे पोवई नाक्यावरील शहराच्या मध्यभागी असणारा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा समस्त साताऱ्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या अभिमानाचा केंद्रबिंदू आहे . यंदाची शिवजयंती विशेष बनवण्याचा निर्धार खासदार छ उदयनराजे भोसले यांनी केला आहे . रविवार दिनांक 19 रोजी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात ही महाआरती होणार आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांची नात शाहीर विनता जोशी यांना या महाआरती कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे . सावरकरांच्या अनेक आठवणी आणि त्यांच्या जीवनातील समर प्रसंग आपल्या खास शाहिरी अंदाजाने प्रसिद्ध करण्यासाठी विनता जोशी यांचे नाव आदराने घेतले जाते .
छत्रपतींचे तेरावे वंशज छ उदयनराजे भोसले व निमंत्रित मान्यवर यांच्या खास उपस्थितीत हा महाआरती कार्यक्रम सोहळा होणार असून यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे ही आरती सायंकाळी सात वाजता पोवई नाका येथील शिवतीर्थावर घेतली जाणार असून सर्व शिवभक्तांनी या महाआरतीस उपस्थित रहावे असे आवाहन श्री छ उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे