23 फेब्रुवारी रोजी दादा महाराज क्रिकेट स्पर्धेचा होणार अंतिम सामना

305
Adv

शाहु स्टेडियमच्या क्रिंडागणावर सुरु असलेल्या श्री. छ. प्रतापसिंह ऊर्फ दादामहाराज चषकटेनिस चेंडू क्रिकेट स्पर्धेत २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून स्पर्धेतील उपांत्य
फेरीच्या सामन्याची रंगत वाढली जाणार असून २३ फेब्रुवारीला सायं. ७.०० वाजता तृतीय क्रमांकाचा तर ९.०० वाजता स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

या स्पर्धेसाठी २ लाख २५ हजाराची रोख पारितोषिके व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत.महाराष्ट्रातील मान्यवर क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे प्रत्येक सामना रंगतदार होत आहे.अंतिम सामन्या नंतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असुन त्या नंतर रात्री महाराजसाहेबांच्या वाढदिवसानिमीत्त सातारा-यातील क्रीडा प्रेमींतर्फे त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला व अंतिम सामन्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समुहातर्फे करण्यात आले आहे.

Adv