जिल्ह्यात होणाऱ्या विविध यात्रेनिमित्त 1951 चे कलम 36 लागू

252
Adv


मांढरदेव ता. वाई येथे श्री काळुबाई मांढरदेवी यात्रा दि.4 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत साजरी होणार आहे. यात्रा कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना 4 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने व्यक्तींचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणानच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

0000

श्री खंडोबा यात्रे निमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

सातारा,दि.23 : पाल ता. कराड येथे श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा दि.3 जानेवारी ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत साजरी होणार आहे. यात्रा कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना 3 जानेवारी ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने व्यक्तींचे वर्तन असावे, ध्वनी प्रदुषणानच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

श्री यमाई देवी यात्रे निमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

सातारा,दि.23 : औंध ता. खटाव येथे श्री यमाई देवाची यात्रा दि.5 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत साजरी होणार आहे. या निमित्ताने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने व्यक्तींचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणानच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

Adv