Monday, April 20, 2026
spot_img
Home Latest News Politics जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा छ उदयनराजे यांना पाठिंबा

जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा छ उदयनराजे यांना पाठिंबा

541
Adv

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या संदर्भात खासदार छ उदयनराजे भोसले हे आक्रमक झाले असून रायगड येथे निर्धार शिव सन्मानाचा हे आंदोलन ते सुरू करत आहेत छ उदयनराजे यांच्या भूमिकेला जालनाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे

हा पाठिंबा त्यांनी लेखी पत्र लिहून कळवला आहे आमदार गोरंट्याल हे दिनांक 3 डिसेंबर रोजी जालना येथील शिव पुतळ्यासमोर बसून छ उदयनराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर करून जन आक्रोश आंदोलन सुरू करणार आहेत या संदर्भात त्यांनी जाहीर केलेल्या पत्रात नमूद केले आहे की औरंगाबाद येथे जाहीर कार्यक्रमात राज्यपाल कोशारी यांनी छत्रपती शिवरायांच्या संदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याकरिता छ उदयनराजे यांनी कोषारी यांना राज्यपाल पदावरून तातडीने हटवावे अशी भूमिका जाहीर केली आहे या भूमिकेला महाराष्ट्रातून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे याची सुरुवात जालना येथील आमदार गोरंट्याल यांनी केली आहे त्यांनी छ उदयनराजेंच्या भूमिका ला शंभर टक्के पाठिंबा जाहीर केला असून आपण ही मागणी लावून धरावी आणि त्या मागणीला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे असे पत्राद्वारे कळवले आहे

Adv