छ उदयनराजे भोसले व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रॅलीमध्ये एकाच गाडीवर स्वार

877
Adv

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे साताऱ्या दौऱ्यावर असताना बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर बसून दोघांनीही रॅली संपन्न केली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी सातारा दौऱ्यावर आले असता विविध कार्यक्रम जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे व भाजपच्या वतीने घेण्यात आले होते त्यापैकी एक म्हणजे राजवाडा ते जिल्हा परिषद मैदान अशी रॅली आयोजित करण्यात आली होती रॅलीच्या पुढे भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची गाडी होती त्या बुलेट गाडीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर मागच्या सीटवर बसून रॅली संपन्न झाली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बुलेट गाडी चालवत आपल्या गाडीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना घेऊन रॅली केली या रॅलीमध्ये जिल्ह्यातील भाजप नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले

Adv