भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार दिनांक 11 रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून साताऱ्यात ते भाजपच्या कार्यकर्त्यांशी प्रदीर्घ संवाद साधणार असून भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची रणनीतीची महत्त्वपूर्ण बैठक कराड येथे होत आहे त्यामुळे बावनकुळे यांचा दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे या दौऱ्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली
चंद्रशेखर बावनकुळे साताऱ्यात सकाळी नऊ वाजता खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या जल मंदिर निवासस्थानी चहापान करणारा असून सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत प्रीती एक्झिक्यूटिव्ह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर साडेअकरा ते बारा भव्य बाईक रॅलीने बावनकुळे यांचे स्वागत केले जाणार असून सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मंडल प्रमुख कार्यकारणी सदस्य यांचा भव्य मेळावा जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी बारा वाजता होणार आहे या मेळाव्यामध्ये जिल्हा संघटनात्मक बैठकीत बावनकुळे मार्गदर्शन करणार असून यावेळी काही पक्षप्रवेशही घेतले जाणार आहेत
दुपारी दीडच्या दरम्यान शासकीय विश्रामगृहामध्ये भाजप सोशल मीडिया ची बैठक होणार असून दुपारी सव्वातीन वाजता बूथ कमिटीची बैठक होणार आहे दुपारी चार वाजता कराड उत्तर येथील इंदोली येथे धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम होणार असून साडेचार वाजता लक्ष्मी नगर उंब्रज येथे सामाजिक कार्यक्रमास बावनकुळे यांची उपस्थिती असणार आहे
सायंकाळी 5:30 वाजता कोल्हापूर नाका कराड येथे युवा वॉरिअर शाखेचे उद्घाटन सायंकाळी सहा वाजता नव मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ साडेसहा वाजता भोई गल्ली कराड येथे सामाजिक कार्यक्रम,साडेसात वाजता मलकापूर कराड येथील सामाजिक कार्यक्रमास उपस्थिती राहणार असून सायंकाळी आठ वाजता शासकीय विश्रामगृहांमध्ये जिल्हा कोअर कमिटीची दीड तास महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका या सर्वच निवडणुकांच्या संदर्भामध्ये बावनकुळे मार्गदर्शन करणार असून पदाधिकारी सदस्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या जाणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून आगामी राजकीय रणनीती या दौऱ्यामध्ये अंतिम केली जाणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात होणारा भाजपचा मेळावा याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे