डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीयांचे द्रष्टे नेते

198
Adv

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चरित्र अत्यंत संघर्षमय आहे.त्यांच्या जीवन चरित्रामधुन युवापिढीला खुप काही शिकण्यासारखे आहे.तत्कालीन समाजव्यवस्थेचे चटके सोसलेल्या डॉ.बाबासाहेबांनी,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वधर्मसमभाव आणि समतेचा विचार भारतीय राज्यघटनेतील विविध आर्टिकल्स व्दारे भारतवासियांना दिला आहे. डॉ. बाबासाहेब हे संपूर्ण भारतीयांचे द्रष्टे नेते आणि महामानव
आहेत असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे कायदामंत्री,राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला.त्याचप्रमाणे तत्कालीनसमाजव्यवस्था, भारतीयांची दैनंदिनी आणि मानसिकता याचा बारकाईने विचार करुन, संपूर्ण जगामध्ये आदर्श ठरलेली राज्यघटना तयार केली. घटनेव्दारे प्रत्येक भारतीयाला कायदयाचे समान संरक्षण दिले आहे. तसेच प्रत्येक भारतीयाला मताचा अधिकार देखिल
दिला आहे. कायदयाचे समान संरक्षण प्रत्येकाला देणा-या डॉ. बाबासाहेब यांनी महिला आणि वंचितांनाराज्यघटनेव्दारेच विशेष सवलतीही दिल्या आहेत.जगातील सर्वात मोठया लोकशाहीची राज्यघटना तयार करण्याचे अवघड कार्य त्यांनी अथक प्रयत्नां मधुन साकारले आहे.राज्यघटनेच्या माध्यमातुन त्यांनी प्रत्येक भारतीयाबाबत उपकारक कार्य केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज डॉ. बाबासाहेबांना एकाठराविक समाजाचे नेते म्हणून ओळख देण्याचे काम होत असल्याचे जाणवत. तथापि त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरीता आपले आयुष्य वेचले आहे.

1900 या दिवशी, भिमराव आंबेडकर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांचा याठिकाणच्या शालेय जीवनाचा तो पहिला दिवस होता. हा शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिन म्हणून राज्यभर गेल्या काही वर्षापासून साजरा होत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शालाप्रवेश दिन विदयार्थी दिन म्हणून राज्यस्तरावर साजरा केला जावायासाठी आमच्या नेतृत्वाखाली सातारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे तत्कालीन सदस्य, युवा नेता प्रविण धस्के यांनीच ठराव मांडून पारित करुन घेतला होता.सदरचा ठराव जिल्हा परिषदेमार्फत राज्यशासनाला सादर केला गेल्यावर, राज्य शासनाचे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी 7 नोव्हेंबर हा डॉ. बाबासाहेब यांचा शालाप्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून हा दिवस विदयार्थी दिन म्हणून साजरा
होत आहे असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर हा शालाप्रवेश दिन देशभरात साजरा होण्यासाठी राष्ट्रीय
विदयार्थीदिन म्हणून घोषित होण्यासाठी येणा-या काळात आम्ही प्रयत्नशील राहणार आहेत.प्रसंगी पंतप्रधानांची भेट घेवून, मागणी केली जाईल.पुढील वर्षाचा विदयार्थी दिन हा राष्ट्रीय विदयार्थी दिन म्हणून आपण सर्वजण मोठया प्रमाणात साजरा करु अशी याप्रसंगी आम्ही ग्वाही देतो असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.

Adv