लक्ष्मीची पाऊले… पूजासाहित्य खरेदीसाठी गर्दी; बाजारपेठ लगबगली

135
Adv

दीपोत्सवातील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. ही पूजा सोमवारी (दि. 24) होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी राजवाडा मंडईसह, मार्केटयार्ड, पोवईनाका मोती चौक या मार्गावर रस्त्यावरील पदपथावर तोबा गर्दी केली होती. काहींनी पदपथावरच व्यवसाय थाटला आहे. यंदा छोट्या व्यावसायिकांनाही रोजगार मिळत असल्याने ही दिवाळी सर्वांसाठी गोड होत आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालीच्या रुपाने लक्ष्मीची पाऊले घरोघरी पडत असल्याचे दृश्‍य आहे.

मागील काही दिवस पावसात गेल्याने साताऱ्यातील नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडलेले दिसले. यात लक्ष्मी (केरसुणी), लाह्या, बत्ताशी, पणती, कलर रांगोळी, लक्ष्मी पट्टी, स्टीकर, किल्लावरील सैनिक, वेगवेगळी चित्रे, बोलके इ. साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली जात आहे. व्यापारी वर्गाकडून लक्ष्मीपूजनानिमित्त कीर्द, खतावण्यांचे पूजन करण्यात येते. प्रथेप्रमाणे बोहरी आळीतील व्यापाऱ्यांकडून कीर्द, खतावण्यांची खरेदी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली.

Adv