सोळशी ता. कोरेगाव येथे आज MIDC विरोधी संघर्ष समिती उत्तर कोरेगाव यांचे वतीने उत्तर कोरेगाव भागातील गावातील शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली
उत्तर कोरेगाव भागातील स्थानिक शेतकरी बांधवांचा MIDC ला विरोध आहे. वडिलोपार्जित जमीन कसणारे हे शेतकरी यांचे पोट या शेतीवर आहे. ती गावे चुकीच्या पद्धतीने MIDC मध्ये टाकण्याचा घाट मागील जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि फलटण मधील नेत्यांनी घातला होता. फलटण मधील या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी शुल्लक किंमत देऊन काही जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. MIDC आला की मोठा मोबदला खायचा हा यामागचा डाव. उत्तर कोरेगाव मधील स्थानिक शेतकऱ्यांचा याला कडाडून विरोध आहे. या संदर्भात आज भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात माण खटाव भागातचं ही MIDC होणार असे यावेळी उपस्थित बांधवांना सांगितले. कोणाच्यात हिम्मत असेल तर कोरेगावात आणून दाखवा असा जाहीर इशारा यानिमित्ताने केला. उत्तर कोरेगाव मधील १ गुंठा जमिनीला हात लावू देणार नाही असे मत यावेळी व्यक्त केले. उत्तर कोरेगावच्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असल्याचेही आमदार जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.