सातारा जिल्ह्यातील पाच नगरपालिकांचा बिगुल वाजला

307
Adv

सातारा जिल्ह्यातील कमी अतिवृष्टीच्या कार्यक्षेत्रातील कराड ,फलटण, वाई, रहिमतपूर ,आणि म्हसवड अशा पाच नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे . या संदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केले असून निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 18 ऑगस्ट रोजी मतदान आणि 19 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत पाच नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 कलम 10 पोट कलम चार नुसार 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर केला आहे सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असतील असे विशेषत्वाने सूचित करण्यात आले आहे निवडणूक आयोगाने 5 जुलै रोजी कराड, फलटण, वाई, रहिमतपूर, म्हसवड या पाच नगरपालिकांच्या अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून मतदान केंद्रनिहाय अंतिम याद्या 9 जुलै रोजी जाहीर केल्या जाणार आहेत 20 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे

दिनांक 22 जुलै सकाळी 11 ते 28 जुलै दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या कालावधीत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरून दाखल करावयाचे आहेत . नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 22 जुलै सकाळी 11 ते 28 जुलै 2022 दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे दिनांक 23 जुलै व 24 जुलै रोजी नामनिर्देशन पत्र सुट्टीच्या कारणास्तव स्वीकारण्यात येणार नाही दाखल नाम निर्देशन पत्रांची छाननी व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 29 जुलै असून सकाळी 11 ते 3 यावेळेत ही यादी जाहीर करण्यात येणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 ऑगस्ट 2022 दुपारी तीन वाजेपर्यंत आहे यासंदर्भात कोणतेही अपील असल्यास उमेदवारांनी आठ ऑगस्टपर्यंत आपल्या हरकती दाखल करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपिलाबाबतचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत . 9 ऑगस्ट रोजी संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्ह अंतिमरीत्या नेमून दिले जाणार असून चिन्हासह उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरम्यान मतदान घेतले जाणार असून दिनांक 19 ऑगस्ट रोजी मतमोजणीचा निकाल सकाळी दहा वाजल्यापासून जाहीर केला जाणार आहे .

महाराष्ट्र शासन राजपत्र कलम 19 नुसार हा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे राज्य निवडणूक आयोगाने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमी पावसाच्या कार्यक्षेत्रातील निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने अचानक प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे पहिल्या टप्प्यामध्ये 92 नगरपरिषद आणि चार नगरपंचायतीचा कार्यक्रम सुरू झाल्याने महसूल विभागाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्देशित केले असून आचारसंहितेची गडबड सुरू झाली आहे सातारा जिल्ह्यातील एकूण आठ नगरपालिकांपैकी पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या क्षेत्रातील सातारा तालुक्यातील सातारा व महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर व जावली तालुक्यातील मेढा नगरपंचायत या चार नगरपालिकांचा निवडणुका कार्यक्रम मात्र पुढील टप्प्यांमध्ये राबवला जाणार आहे

कराड फलटण वाई रहिमतुर म्हसवड या पाच नगरपालिकांसाठी शुक्रवार दिनांक आठ जुलैपासून प्रत्यक्ष आचारसंहिता लागू झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले असून या निवडणुकीवर प्रभाव टाकणारी कोणतीही घोषणा अथवा योजना आता राबवता येणार नाही याच्या स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने त्या त्या पालिका कार्यक्षेत्रातील मुख्याधिकाऱ्यांना आणि प्रशासकांना दिले आहेत राखीव जागेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून सदर घोषणापत्र बारा महिन्याच्या आत असणारे असावे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाची वेळ ही सकाळी साडेसात ते साडेपाचशे असणार आहे निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीवर राबवली जाणारा असून उमेदवारांनी सॉफ्टवेअरद्वारेच नामनिर्देशन पत्र व शपथपत्रातील माहिती पंचायत इलेक्शन डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर भरावयाची आहे सार्वत्रिक निवडणूक असलेल्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या प्रभाग रचना आरक्षण सोडत व मतदार यादी संदर्भात जर न्यायालयात याचिका दाखल असतील तर याबाबतची खात्री जमा करून न्यायालयाच्या आदेशानुसार ती कार्यवाही करण्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची आहे असे निवडणूक आयोगाने निर्देशित केले आहे

निवडणूक आयोगाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे अंतिम प्रभाग न्याय मतदार यादी प्रसिद्धी 5 जुलै 2022

मतदान केंद्र व प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धी 9 जुलै 2022

जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम करण्याची तारीख 20 जुलै 2022

नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचा कालावधी 22 जुलै 2022 ते 28 जुलै 2022 सकाळी 11 ते 3

नामनिर्देशन छाननी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी 29 जुलै 2022 सकाळी अकरा वाजल्यापासून

नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत

उमेदवारांची यादी चिन्हासह जाहीर करण्याची तारीख 8 ऑगस्ट 2022

मतदानाचा दिनांक 18 ऑगस्ट 2022 सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच

मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 19 ऑगस्ट 2022 सकाळी दहा वाजल्यापासून

Adv