सातारा दिनांक 18 प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेणाऱ्या मान विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची शनिवारी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी झालेली भेट जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली ही भेट अतिशय अनौपचारिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले
भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली कमरा बंद चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही आमदार जयकुमार गोरे एका ॲट्रॉसिटी प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे मार्च मध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच सूत्रे स्वीकारली होती त्यांच्या नव्या कारकिर्दीला प्रारंभ होताच वेगवेगळ्या पोलीस केस मध्ये अडकवण्याचे सत्र सुरू झाल्याने त्यांनी काही काळ ब्रेक घेतला होता मात्र कशातही शनिवारी जिहे-कठापूर योजनेच्या संदर्भात राष्ट्रवादी नेत्यांचे चाललेले षड्यंत्र आणि त्यासंदर्भातील राजकारण याची पत्रकारांना माहिती देण्यासाठी जयकुमार गोरे साताऱ्यात आले होते
पत्रकार परिषदेनंतर आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले या वेळी भाजपच्या दोन्ही नेत्यांनी कमरा बंद चर्चा केली जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना पत्रकार परिषद टार्गेट केले तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाच थेट काही दिवस आपले लक्ष केले होते राष्ट्रवादीच्या या टीकात्मक विधानानंतर जयकुमार गोरे आणि उदयनराजे भोसले यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे पक्ष संघटनेचा विस्तार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभयतांनी चर्चा केल्याची माहिती आहे मात्र दोघांनीही या गोष्टीचा इन्कार केल्याने नक्की काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे






