Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District श्री छ उदयनराजे युवा मित्र समूहाने केला नूतन खासदार धनंजय महाडिक...

श्री छ उदयनराजे युवा मित्र समूहाने केला नूतन खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार

723
Adv

महाविकास आघाडीने दबावतंत्र वापरून त्यांच्या उमेदवारांना कोंडून ठेवले होते हे तंत्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे त्यामुळेच त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला असा आरोप भाजपचे नूतन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी साताऱ्यात केला राज्यसभेच्या खासदार पदी निवड झाल्या नंतर प्रथमच मुंबईवरून कोल्हापूरला जात असताना सातारा शहर महामार्गावरील हॉटेल राजेशाही येथे त्यांचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे युवा मित्र समूहाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले उदयनराजे मित्र समूहाचे सक्रीय सदस्य व युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी त्यांचे पेढ्याचा हार घालून स्वागत केले

त्या वेळी पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी आपल्या विजयानंतर ची पहिली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले भाजप या निवडणुकीमध्ये अत्यंत खुलेपणाने प्रक्रियेला सामोरा गेलेला पक्ष आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे उमेदवार त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघांमध्ये खुलेपणाने फिरत होते पक्षीय बलाबल तसेच राजकीय परिस्थिती याचा अंदाज चाणाक्षपणे घेत विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी वापरलेल्या रणनीतीचा निश्चितच फायदा झाला . मात्र महा विकास आघाडीने दबावतंत्राचा वापर करून आपल्या उमेदवारांना एका विशिष्ट ठिकाणी हॉटेलमध्ये ठेवले होते हे दबावतंत्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे राजकारणातल्या या तंत्रामुळे त्यांचा उमेदवाराचा पराभव झाला आहे . आमच्या नेत्यांनी अत्यंत चाणाक्षपणे राजकीय परिस्थिती हाताळत शेवटपर्यंत दाद मागितल्याने परिस्थिती सोपी झाली या विजयाचे श्रेय पक्षाला आणि आमची प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित आहे . यापुढे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील मोर्चेबांधणी मध्ये पक्ष आदेशाप्रमाणे कायमच माझे सक्रिय योगदान राहील असे स्पष्ट आश्वासन यावेळी धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले

विविध ठिकाणी महाडिक यांचे जंगी स्वागत झाले कार्यकर्त्यांच्या उदंड प्रेमाने मी निश्चितच भारावलो असून कार्यकर्त्यांना सातत्याने ताकत देण्याचे काम माझ्याकडून होत राहील पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या उभारणीत संघटन मजबुती करणाचे काम यापुढे अहोरात्र करणार असल्याचे महाडीक यांनी स्पष्ट केले यावेळी उद्योजक संग्राम बर्गे यांच्यासह आबा शिंदे किरण नलवडे विठ्ठल जाधव राजू पिसाळ विजय पवार संजय चव्हाण मनीष घोरपडे अमोल तांगडे सागर साळुंखे संतोष घाडगे राजाभाऊ कुंभार गणेश जाधव पंकज चव्हाण महेश चौगुले निलेश पाटील चिन्मय कुलकर्णी अमोल बनगर प्रणव लेवे योगेश पाटील सुजित पिसाळ काशिनाथ गोरड धनेश खुडे युवाशक्ती फाऊंडेशन व मित्र समूहाचे बरेचसे वरिष्ठ सदस्य उपस्थित होते

Adv