आ मकरंद पाटील यांनी घेतली खा श्री छ उदयनराजे यांची भेट

479
Adv

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या कारखाना बचाव शेतकरी पॅनल ने आमदार मदन भोसले यांच्या पॅनेलचा पराभव करून सत्ता हस्तगत केली.या विजयाने आमदार मकरंद पाटील यांच्या राजकीय कौशल्यावर शिक्का मोर्तब झाले त्यानंतर प्रथमच मकरंद पाटील यांनी शनिवारी संध्याकाळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली यावेळी खासदार उदयनराजे यांनी मकरंद पाटील यांचे पेढा भरवून त्यांचे कौतुक केले

सहकारामध्ये राजकारणाचा कोणताही स्पर्श नसतो हे सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वारंवार सिद्ध झाले आहे आमदार मकरंद पाटील यांनी उदयनराजे यांची घेतलेली भेट जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चा घडवून गेली आमदार पाटील व खासदार उदयनराजे यांनी सुमारे पाऊण तास वेगवेगळ्या विषयावर दिलखुलास चर्चा केली .कारखान्याच्या कारभारात शेतकऱ्यांवर अन्याय होऊन देऊ नका अशी अपेक्षा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केली .

मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या साडेनऊ हजार मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला . तब्बल 19 वर्षाची मदन भोसले यांची कारखान्यातील सत्ता संपुष्टात आली आता किसनवीर कारखान्याला नवा चेअरमन कोण या प्रश्नाची चर्चा कारखान्याचे कार्य क्षेत्र असणाऱ्या पाच तालुक्यांमध्ये सुरू आहे यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी या विजयानंतर शनिवारी सायंकाळी जलमंदिर येथे खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली . आ मकरंद पाटील यांचे छत्रपती उदयनराजे यांनी पेढे व श्रीफळ देऊन स्वागत केले . पाच तालुक्याच्या कार्यक्षेत्रात उभा असणारा उस गाळपासाठी गेला पाहिजे असा आग्रह खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी धरत मकरंद पाटील यांना पेढा भरविला .

सातारा तालुक्या मध्ये सुद्धा किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत मकरंद पाटील यांच्या पॅनलला विजयी करण्यामध्ये सातारा तालुक्याने सुद्धा प्रभावी कामगिरी बजावली खासदार उदयनराजे भोसले व माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचा ही स्नेह खूप जुना आहेखासदारकीच्या तत्कालीन निवडणुकांमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना वाई तालुक्याने नेहमीच साथ दिली होती या राजकीय संदर्भाची या निमित्ताने पुन्हा उजळणी झाली

Adv