Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जय सोशल फाउंडेशन च्या रंगोत्सवात युवतींची धूम

जय सोशल फाउंडेशन च्या रंगोत्सवात युवतींची धूम

235
Adv

जय सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित रंगोत्सव कार्यक्रमात डीजेच्या तालावर महिलांनी चांगलाच ताल धरला एकमेकांना रंगपंचमीचा रंग लावत महिलांनी रंगारंग कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाची शाहूनगर पंचक्रोशीत चांगलीच चर्चा झाली

खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांचे समर्थक व उद्योजक सागर भोसले यांच्या कल्पनेतून या रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . जय सोशल फाउंडेशन खासदार उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन नेटकेपणाने पार पडले . शाहूनगर चा एका विस्तीर्ण प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला तेव्हा या तारांगणाला विशेष सुरक्षा प्रदान करण्यात आली होती युवती आणि महिला यांनी रेन डान्स आणि डीजेच्या तालावर ठेका धरत रंगपंचमीचा तब्बल तीन तास आनंद लुटला एकमेकांना आनंदात बुडवत महिला आपल्या रोजच्या सांसारिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून छानपणे रंगपंचमीचा आनंद लुटत होत्या . या वेळी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांना ही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच काही महिलांसाठी विशेष सोडतीचे आयोजन करण्यात आले होते

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा रंजना रावत गीतांजली कदम माजी शिक्षण सभापती सुनील काटकर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे तसेच उदयनराजे मित्र समूहाचे बहुतांश व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित महिलांनी हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात यावा अशी आग्रही मागणी सागर भोसले यांच्याकडे नोंदविण्यात आली सोडतील सोडतीत विजेत्या झालेल्या महिलांना मिक्सर कुलर यासारख्या अनेक बक्षिसांचे वाटप करण्यात आले खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचे विशेष अभिनंदन केले

Adv