जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या मदतीने शेताकडे जाणारा रस्ता आडवला असून गेल्या वर्षभरापासून मला आर्थिक व मानसिक दृष्ट्या त्रास देऊन खच्ची करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप मधुकर बिरामाणे यांनी केला आहे
मधुकर बिरामणे यांनी याबाबत जिल्हाधिकारीसह विविध प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आपली वस्तुस्थिती मांडली मात्र जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र राजपुरे यांच्या दहशती पुढे बिरामणे यांच्यावरच खोट्या केसेस घालून विनाकारण नाहक त्रास गेल्या वर्षभरापासून चालू असून याप्रकरणी आता त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पत्र लिहून आपली तळमळ व्यक्त केली आहे
महाबळेश्वर तालुक्यात राजेंद्र राजापुरे हे राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक असून शेतकऱ्यांचा रस्ता अडवणे हे कितपत योग्य आहे याचा विचारही त्यांनी करावा असे बिरामणे यांचे म्हणणे असून सत्तेचा दुरुपयोग हा सर्रास महाबळेश्वर तालुक्यात राजेंद्र राजपुरे यांच्याकडून चालू असून पाचगणी पोलीस स्टेशन मधून ही मला फोन येत असून दहशत माजवण्यासाठी गावात पोलीस गाडी पाठवून भीतीचे वातावरण निर्माण केला असल्याचा आरोपही बिरामणे यांनी केला आहे