Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शाहूपुरीकरांची तहान भागवल्याचा निश्चित आनंद खा श्री छ उदयनराजे

शाहूपुरीकरांची तहान भागवल्याचा निश्चित आनंद खा श्री छ उदयनराजे

238
Adv

आमच्या महसूल राज्यमंत्री पदाच्या काळात,तत्कालिनपालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन झाले होते. दरम्यान
सत्तापालट झाला. जनतेच्या दुर्दैवाने, श्रेयवादामधुन ही योजना चांगली असुनही बासनात गुंडाळली गेली. त्यामुळे नागरीक मात्र या योजनेच्या पाण्यापासून सुमारे 20 वर्षे वंचित राहीले याची खंत आणि क्लेश जरुर आहेत. तथापि देर है लेकिन अंधेर नहीं है याचे समाधान आहे असे उद्गार साविआचे अध्यक्ष आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शाहुपूरी 27 बाय 7 या योजनेच्या पाणीपुरवठयाची यंत्रणा कळ दाबुन कार्यान्वित करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक बोलत होते. यावेळी
सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, अॅड.डि.जी.बनकर,नगरसेवक वसंत लेवे,बाळासाहेब ढेकणे, तत्कालीन शाहुपूरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, यांचेसह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले की, कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा ही भुमिपूजन झालेली याजना मार्गी लागली असती तर केवळ 16
कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कमेमध्ये शाहुपुरी, शिवराज पेट्रोलपंपाच्या पूर्वेकडील वसाहतींसह योजनेतील मार्गावरील एकूण 18 गांवांतील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येला ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा उपलब्ध झाला असता. 1999 नंतर सत्ताबदल झाला. आम्ही आमदार म्हणून राहीलो नाही.अनेकविनंत्या-आर्जव करुन देखिल केवळ आम्हाला श्रेय मिळेल या संकुचित हेतुने एक चांगली पाण्याची सुविधा देणारी योजना अडगळीत टाकण्यात आली. पुढे मृतवत झाली. आजच्या शाहुपूरी 24 बाय 7 योजनेमधुन शाहुपूरी आणि काहीसा करंजेमधील सुमारे 10 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या भागाकरीता प्रथम 31 कोटी आणि नंतर वाढील अंदाजपत्रकानुसार सुमारे 42 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. निव्वळ श्रेयवादामुळे हे झालेले सार्वजनिक पैश्याचे दुहेरी नुकसान कुणी काहीही.म्हटले तरी निश्चितच कधीही भरुन न येणारे आहे.श्रेयवादाची मानसिकता कुणाचीही असु नये. नागरिकांना मिळणा-या मुलभुत सुविधा
केंद्रबिंदू ठेवल्या पाहीजेत. आपणाला जमलं तर जरूर करावे. परंतु दुसरा काही करीत असेल तर त्याला एक तर सहाय्य नाही जमले तरी खोडा तरी घालु नये. श्रेयवाद ही संकुचित मानसिकता आहे. राजकारण्यांचा तर व्यापक दृष्टीकोन असलाच पाहीजे.श्रेयवादापासून दूर राहीले पाहीजे.अन्यथा त्याचे दुष्परिणाम शेवटी जनतेला भोगावे लागतात.याचे उत्तम उदाहरण म्हणून तत्कालीन कण्हेर उद्धव योजनेकडे पाहीले जात असेल.
तथापि या पार्श्वभुमीवर देखिल आम्ही सार्वजनिक जीवनात सकारात्मक आणि व्यापक दृष्टीकोनामधुन पहात आलो आहोत. वाईटातील वाईटात सुध्दा चांगलं बघण्याची वृत्ती आम्हीठेवली आहे.जे जे होते ते भल्यासाठी होते असे समजुन आम्ही मार्गक्रमण करीत आहोत.

Adv