रणदुल्लाबाद मध्ये डेंगूने युवकाचा मृत्यू ?आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

682
Adv

रणदुल्लाबाद तालुका कोरेगाव येथील अमित शिंदे नामक युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे समजते ? जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हा मृत्यू झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले

रणदुल्लाबाद गावात गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यूने डोके वर काढले आहे गावांमध्ये सात ते आठ पेशंट असून ग्रामपंचायत ही याकडे दुर्लक्ष करत आहे येत्या काही दिवसातच ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा समोर तीव्र आंदोलन करून या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला काळे फासणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे युवा नेते रवींद्र जगताप यांनी सातारानामशी बोलताना सांगितले

डेंगू न पसरण्यासाठी खबरदारी घेणार ़़जितेंद्र जगताप

गेल्या पंधरा दिवसापूर्वीच ग्रामपंचायतीकडून डेंगूची फवारणी गावात केली असून सदर युवकाला हॉस्पिटल मध्ये मी स्वतः अँडमिट केले जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा गावांमध्ये फिरून सर्वे केला आहे आम्ही सर्वांना वारंवार डेंगू संदर्भात जनजागृती करत असून मेडिक्लोर चे ही वाटप गावात केले असून जी जी खबरदारी डेंगूच्या संदर्भात घेता येईल ती इथून पुढेही घेण्यास ग्रामपंचायत सक्षम असल्याचे मत युवा नेते जितेंद्र जगताप यांनी सातारानामशी बोलताना सांगितले

Adv