सहकारमंत्री महोदय सर्वसामान्य नागरिकांच्या कर्जाच्या हप्त्यात सवलत देण्याच्या आदेश निघणार तरी कधी

230
Adv

लॉकडाउन लावून राज्यात जवळपास आता महिना उलटत आला पण सर्व सामान्य कर्जदार यांच्या हापत्याला सवलत देण्याचा आदेश अद्यापही निघाला असून तो निघणार तरी कधी अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यामुळे राज्य सरकारने लाँकडाऊन लावून .कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न चालू आहेत मात्र सर्वसामान्य नागरिकांनी विविध कारणांसाठी नॅशनल बँक ,सहकारी बँक, पतसंस्था ,फायनान्स आदी संस्थांकडून कर्ज घेतले आहे जरी सरकारने लाँक डाऊन लावला असला तरी सर्व बँकांना कर्जदारांच्या हप्त्यात सवलत देण्याचा आदेश राज्य सरकारने अद्यापही काढला नसून तो लवकरात लवकर निघावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गेल्या आठवड्यात या कर्जदारांना सवलत देण्याच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याने कर्जदार यांचा जीव मेटाकुटीला आला आहे

लाँकडाऊन मुळे सर्वांचेच काम धंदे बंद आहेत तरी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्जदारांना लवकरात लवकर हप्त्यात सवलत देऊन दिलासा द्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक करत आहेत

Adv