सेंट्रल रोड फंड साठी उदयनराजे यांचा यशस्वी पाठपुरावा जिल्हयातील रस्त्यासाठी वीस कोटी मंजूर

166
Adv

केंद्राच्या सेन्ट्रल रोड फंड (सीआरएफ)मधुन सातारा शहरातील वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याच्या कामासाठी आणि कराड-पाटण तालुक्यातील डिचोली नतजा,हेळताक,मोरगिरी,गारवडे साजुर-तांडते.लिंग-वाठार-रेठरे-शेणाली स्टेशन अखेर राज्य महामार्ग क्रमांक 148 वरील कि.मी.69 ते कि.मी.73 या टप्यातील कामासाठी रुपये 4 कोटी 91 लाख असा एकूण सुमारे 20 कोटींचा भरघोस निधी खा श्री छ उदयनराजे यांच्या प्रयत्न आणि सातत्याच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे अशी माहीती जलमंदिर पॅलेस येथून प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

जास्तीत जास्त निधी शासनाकडून प्राप्त करुन,सातारा जिल्हयाच्या सर्वागिण विकासाकरीता खा श्री छ उदयनराजे भोसले हे नेहमीच सातत्याने प्रयत्न करीत असतात रस्ते मजबुत
असतील तर दळणवळण सोयीचे होतेच तथापि सुरक्षित दळणवळणाची सुविधा निर्माण होते म्हणून,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सेन्ट्रल रोड फंडराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम,जिल्हापरिषद बांधकाम विभाग, आदींच्या माध्यमातुन खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हयातील आणि शहरातील रस्त्यांच्या दोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी जास्तीत जास्त तरतुद मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

कराड-पाटण तालुक्यातील डिचोली ते शेणोली रेल्वे स्टेशन या राज्य महामार्ग क्रमांक 148 च्या कि.मी. 69 ते कि.मी.73 अखेरच्या रस्ता मजबुतीकरणाचे कामासाठीही सासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी क-हाइ नगरीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या समवेत प्रस्तावित केले होते. तसेच सातारा शहराचा अगनेय पूर्वेकडील होणार विस्तार आणि सातारा शहराची झालेली हद्दवाढ विचारात घेवूनङराज्य महामार्ग क्रमांक 117 चा काही भाग असलेल्या वाढे फाटा ते पोवई नाका या सातारा शहरातील रस्त्याची दोन्नती आणि सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते.त्यानुसार केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांच्या अखत्यारित येणा-या सेन्ट्रल रोड फंड मधुन या
दोन्ही कामांसाठी एकूण सुमारे रुपये 20 कोटी इतका भरघोस निधी केंद्र सरकारच्या माध्यमातुन मंजूर करण्यात आला आहे. एका लोकप्रतिधीने इतका भरघोस निधी एकाच वेळी मंजूर करन आणण्याची अवघड बाब खा श्री छ उदयनराजे यांची विकास साधण्यासाठी असलेली उत्कट तळमळ सातत्याचे प्रयत्न यामधुनच शक्य झाले आहे. या दोन्ही रस्त्यांच्या कामामुळे फार मोठी सुविधा ग्रामस्थनागरीकांना होणार आहे असेही प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.

Adv